नगर जिल्ह्यात 24 तासात 646 करोना रुग्ण

करोना बळींचे शतक । एकूण बाधित 9 हजार 240
नगर जिल्ह्यात 24 तासात 646 करोना रुग्ण

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात करोना आता गुणाकार पध्दतीने वाढण्यास सुरूवात झाली आहे. याचसोबत आरोग्य विभागाने चाचण्या वाढविल्याने मोठ्या संख्येने करोनाबाधित समोर येताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात नव्याने करोनाचे 646 रुग्ण समोर आले. यात, जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमधून 39, अँटीजेन चाचणीद्वारेे 311 आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 296 अहवाल पॉझिटिव्ह आले.

यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3 हजार 274 झाली आहे. आतापर्यंत 5 हजार 866 बाधितांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.48 टक्के आहे. जिल्ह्यातील मृतांच्या आकड्याने शतक गाठले असून एकूण बाधितांची संख्या आता 9 हजार 240 झाली आहे.

शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये दुपारपर्यंत 15 रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर 1, मनपा 9, कॅन्टोन्मेंट 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर, आणखी 24 रूग्ण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 6, नगर ग्रामीणमध्ये जेऊर 1, घोसपुरी 1 असे 2. कोपरगाव 1, जामखेड 1, कँटोन्मेंट 1, श्रीरामपुर 6, नेवासा 1, पारनेर 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 311 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 55, संगमनेर 15, राहाता 12, पाथर्डी 55, नगर ग्रामीण 7, श्रीरामपुर 23, कॅन्टोन्मेंट 15, नेवासा 4, श्रीगोंदा 19, पारनेर 12, अकोले 19, राहुरी 16, शेवगाव 6, कोपरगाव 18, जामखेड 5 आणि कर्जत 30 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 296 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 226, संगमनेर 3, राहाता 3, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 15, श्रीरामपूर 4, कॅन्टोन्मेंट 8, नेवासा 4, श्रीगोंदा 3, पारनेर 12, अकोले 1, राहुरी 4, शेवगाव 1, कर्जत 8आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

सारांश

* बरे झालेले एकूण रुग्ण 5 हजार 866

*उपचार सुरू असलेले रूग्ण 3 हजार 274

*मृत्यू 100

*एकूण रूग्ण संख्या 9 हजार 240

जिल्ह्यात शनिवारी सकाळी 533 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 177, संगमनेर 35, राहाता 10, पाथर्डी 32, नगर ग्रामीण 22, श्रीरामपूर 13, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 20, श्रीगोंदा 60, पारनेर 32, अकोले 11, राहुरी 7, शेवगाव 44, कोपरगाव 13, जामखेड 26, कर्जत 4, मिलिटरी हॉस्पिटल 13, इतर जिल्हा 1 असे आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 5 हजार 866 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com