चिंताजनक ! नगर जिल्ह्यात शुक्रवारी वाढले 559 रुग्ण
सार्वमत

चिंताजनक ! नगर जिल्ह्यात शुक्रवारी वाढले 559 रुग्ण

3 हजार 165 करोना अ‍ॅक्टिव्ह

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत 559 जणांची भर पडली. यात, जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमधून 22, अँटीजेन चाचणीमध्ये 321 आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 216 बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा एकूण आकडा 8 हजार 594 झाला.

उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 3 हजार 165 आहे. दरम्यान, करोनाचा उपचार घेऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 333 झाली. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 62.05 आहे.

शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 22 रुग्ण बाधित आढळून आले. बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कोपरगाव 1, मनपा 5, नगर ग्रामीण 3, भिंगार कॅन्टोन्मेंट 6, शेवगाव 1, राहुरी 1 , कर्जत 1, नेवासा 1, पारनेर 2, श्रीगोंदा 1 रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत काल 321 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 50, संगमनेर 34, राहाता 10, पाथर्डी 31, नगर ग्रामीण 11, श्रीरामपुर 10, कॅन्टोन्मेंट 18, नेवासा 19, श्रीगोंदा 23, पारनेर 12, अकोले 5, राहुरी 4, शेवगाव 24, कोपरगाव 32, जामखेड 9 आणि कर्जत 29 याा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 216 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 165, संगमनेर 11, राहाता 2, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 7, श्रीरामपूर 2, कॅन्टोन्मेंट 1, नेवासा 5, श्रीगोंदा 3, पारनेर 2, अकोले 6, राहुरी 1, कोपरगाव 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

368 करोनामुक्त

शुक्रवारी उपचार घेवून करोनावर मात केलेल्या 368 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 135, संगमनेर 32, राहाता 7, पाथर्डी 19, नगर ग्रामीण 13, श्रीरामपूर 22, कॅन्टोन्मेंट 20, नेवासा 41, श्रीगोंदा 2, पारनेर 29, अकोले 11,राहुरी 01, शेवगाव 2, कोपरगाव 17, जामखेड 02, कर्जत 15 यांचा समावेश आहे. आतापर्यंत करोनावर मात करून घरी गेलेल्यांची संख्या आता 5 हजार 333 झाली आहे.

बळींची वाटचाल शतकाकडे

जिल्ह्यातील करोनाबळींची वाटचाल आता शतकाकडे सुरू झाली आहे. गुरूवारी जिल्ह्यातील करोनाबळींची शासकीय आकडेवारी 94 होती. त्यात शुक्रवारी दोनने वाढ झाली असून जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या आता 96 झाली आहे.

आमदार निगेटिव्ह, आमदार पूत्र पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील नगर शहराला जोडून असणार्‍या उत्तरेतील एक आमदार आणि सरकारमधील प्रतिनिधीचा सरकारी प्रयोग शाळेतील करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर बीड जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्याला खेटून असणार्‍या विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार पुत्राचा नगरमधील खासगी प्रयोग शाळेतील करोना आणि सारीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महसूलच्या साहेबांना बाधा

महसूल विभागात कार्यरत असणारे एका साहेबांना करोनाची लागण झाली आहे. यासह महसूल विभागातील एक महिला आणि पुरूष कर्मचारी देखील करोना संक्रमित झाले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणे महसूलमध्ये देखील करोनाचा संसर्ग वाढण्यास सुरूवात झाली आहे.

सारांश

* बरे झालेले एकूण रुग्ण 5 हजार 333

* उपचार सुरू असलेले रूग्ण 3 हजार 165

* मृत्यू 96

* एकूण रूग्ण संख्या 8 हजार 594

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com