Corona
Corona
सार्वमत

चिंताजनक ! करोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे

आणखी 403 रुग्णांची भर : बाधितांचा आकडा 5 हजार 911

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रविवारी संपलेल्या 24 तासांत करोना बाधितांच्या संख्येत 403 ने वाढ झाली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमधून 57, अँटीजेन चाचणीत 195 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 151 नव्या रुग्णांची भर जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत पडली आहे.

यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा 5 हजार 911 झाला आहे. तर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 2 हजार 71 इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा केला आहे.

रविवारी दुपारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालानूसार जिल्ह्यात नव्याने करोनाचे 34 रुग्ण समोर आले. यात मनपा 14, संगमनेर 5, पाथर्डी 2, नगर ग्रामीण 1, कॅन्टोन्मेंट 1 आणि कोपरगाव येथील 1 रुग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील 10 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत बाधित आढळून आले.

त्यानंतर सायंकाळी आणखी 33 बाधीत रुग्ण आढळून आले. यामध्ये नगर शहरातील भिस्तबाग 1, शहर 1, मिलिटरी हॉस्पिटल 13 असे 15 रुग्ण. अकोले शहरातील 10 आणि उंचखडक 1, असे 11 रुग्ण. पारनेर तालुक्यातील सुपा 2, पारनेर शहर 3, राईतळे 1, गंजभोयरे 1 असे 7 रुग्ण. कर्जत तालुक्यातील सुपेकरवाडी येथे 1 रुग्ण आढळून आला.

अँटीजेन चाचणीत रविवारी 195 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 10, संगमनेर 16, पाथर्डी 26, नगर ग्रामीण 6, श्रीरामपुर 17, कॅन्टोन्मेंट 12, नेवासा 20, श्रीगोंदा 17, पारनेर 10, अकोले 04, शेवगाव 12, कोपरगाव 37, जामखेड 3 आणि कर्जत 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 151 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 118, संगमनेर 7, राहाता 2, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 6, कॅन्टोन्मेंट 2, नेवासा 1, श्रीगोंदा 2, पारनेर 4, अकोले 4, शेवगाव 2 आणि कर्जत येथील 1 रुग्णांचा समावेश आहे.

आणखी 123 रुग्ण सोडले घरी

रविवारी आणखी 123 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 52, संगमनेर 2, राहाता 5,पाथर्डी 14, नगर ग्रामीण 7, श्रीरामपूर 5, नेवासा 11, श्रीगोंदा 10, पारनेर 3, राहुरी 1, शेवगाव 1, कोपरगाव 8, जामखेड 3, इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. यामुळे बरे झालेल्या व्यक्तींची संख्या आता 3 हजार 762 झाली आहे.

सारांश

- बरे झालेली रुग्ण संख्या 3 हजार 762

- उपचार सुरू असलेले रूग्ण 2 हजार 71

- मृत्यू 78

- एकूण रूग्ण संख्या 5 हजार 911

जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 78 झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून शनिवारी दिलेल्या सरकारी मृत्यूच्या आकडेवारीत जिल्ह्यात 74 मृतांची नोंद होती. रविवारी दिलेल्या आकडेवारी आणखी चार मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे हा आकडा हळूहळू पुढे सरकत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com