करोना अपडेट
करोना अपडेट
सार्वमत

जिल्ह्यात पाच मृत्यूसह 354 नव्या करोनाग्रस्तांची भर !

एकूण बाधितांचा आकडा 13 हजार 223

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या काही आठवड्यानंतर रविवारी गेल्या 24 तासांतील जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 354 पर्यंत खाली आल्याचे समोर आले आहे. एकीकडे करोनातून बरे होणार्‍या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आणि संसर्ग झालेल्याची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याने रविवारी जिल्ह्यात उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 2 हजार 984 झाली आहे.

दरम्यान, रविवारी पुन्हा जिल्ह्यातील मृतांच्या आकडेवारीत पाचची भर पडली असून मृतांची संख्या आता 158 झाली आहे. जिल्ह्यात करोनामुक्त रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला असून बाधितांचा आकडा देखील 13 हजार 223 झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये रविवारी 111,अँटीजेन चाचणीत 142 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 101 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 85, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 10, श्रीरामपूर 1, भिंगार कॅन्टोन्मेंट 3, पारनेर 4 आणि कोपरगाव 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 142 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर 24, राहाता 3, पाथर्डी 7, श्रीरामपुर 10, श्रीगोंदा 15, पारनेर 21, अकोले 15, राहुरी 2, शेवगाव 9, कोपरगाव 16, जामखेड 16 आणि कर्जत 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 101 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 60 संगमनेर 5, राहाता 5, नगर ग्रामीण 16, श्रीरामपुर 1, नेवासा 2, श्रीगोंदा 1, पारनेर 1, अकोले 4, राहुरी 3, जामखेड 1 आणि कर्जत 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com