नगर जिल्ह्यात 152 नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

नगर जिल्ह्यात 152 नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 188 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 65 हजार 001 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.82 टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 152 ने वाढ झाल्याने सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1140 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 34, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 81 आणि अँटीजेन चाचणीत 37 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 05, कर्जत 01, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 01, पारनेर 04, राहाता 03, राहुरी 02, संगमनेर 04, शेवगाव 08, श्रीगोंदा 03, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 18, अकोले 05, कर्जत 01, कोपरगाव 05, नगर ग्रामीण 03, नेवासा 03, पारनेर 13, पाथर्डी 02, राहाता 05, राहुरी 03, संगमनेर 13, शेवगाव 01, श्रीरामपूर 02, इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 37 जण बाधित आढळुन आले. यामध्ये जामखेड 02, कर्जत 03, कोपरगाव 04, नेवासा 06, पाथर्डी 05, राहाता 02, संगमनेर 13, शेवगाव 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 71, अकोले 04, जामखेड 06, कर्जत 12, कोपरगाव 06, नगर ग्रामीण 07, नेवासा 03 , पारनेर 06, पाथर्डी 07, राहाता 18, राहुरी 01, संगमनेर 30, शेवगाव 04, श्रीगोंदा 06, श्रीरामपूर 05, इतर जिल्हे 01 आणि राज्या बाहेरील 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 66001

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 1140

* मृत्यू : 1025

* एकूण रूग्ण संख्या : 68166

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com