करोना : 260 मुक्त, 338 वाढले

करोना : 260 मुक्त, 338 वाढले

अहमदनगर| प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज २६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर 338 बाधितांची भर पडली.

करोनामुक्त झालेल्यांची संख्या ५९ हजार ६४३ आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६१ टक्के आहे. दरम्यान, उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १८१३ आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८ आणि अँटीजेन चाचणीत १६७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ०२, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०३, पाथर्डी ०४, रहाता १०, राहुरी ०१, संगमनेर ०८, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, अकोले ०८, जामखेड ०१, कर्जत ०६, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०८, पारनेर ०२, पाथर्डी ०३, राहाता १२, राहुरी ०३, संगमनेर १९, शेवगाव ०३, श्रीरामपूर ०४ आणि कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०६, अकोले १९, जामखेड ०४, कर्जत ९, कोपरगाव ०६, नेवासा २१, पारनेर ०५, पाथर्डी १६, राहाता १८, राहुरी ०७, संगमनेर २३, शेवगाव ११, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३८, अकोले २२, जामखेड ०८, कर्जत १२, कोपरगाव १०, नगर ग्रा.२५, नेवासा ११, पारनेर १२, पाथर्डी १४, राहाता ३२, राहुरी १५, संगमनेर ४२, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०६ आणि कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com