नगर जिल्ह्यात आज ‘ऐवढ्या’ करोना रूग्णांची वाढ

नगर जिल्ह्यात आज ‘ऐवढ्या’ करोना रूग्णांची वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 391 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 52 हजार 198 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.38 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 254 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1685 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 41, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 60 आणि अँटीजेन चाचणीत 153 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 16, कर्जत 01, नगर ग्रामीण 01, पारनेर 01, पाथर्डी 10, शेवगाव 03, श्रीगोंदा 07 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 19, अकोले 02, कर्जत 01, नगर ग्रामीण 07, नेवासा 05, पारनेर 01, राहाता 03, राहुरी 04, संगमनेर 09, श्रीरामपूर 09 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 153 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 05, अकोले 13, जामखेड 06, कर्जत 25, कोपरगाव 05, नगर ग्रामीण 01, नेवासा 08, पारनेर 01, पाथर्डी 13, राहाता 14, राहुरी 03, संगमनेर 21, शेवगाव 27, श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 88, अकोले 38, जामखेड 15, कर्जत 18, कोपरगाव 09, नगर ग्रा 16, नेवासा 22, पारनेर 19, पाथर्डी 23, राहाता 28, राहुरी 12, संगमनेर 44, शेवगाव 23, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 22, मिलिटरी हॉस्पिटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 52198

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 1685

* मृत्यू : 841

* एकूण रूग्ण संख्या : 54724

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com