उच्चांक : नगर जिल्ह्यात करोनाचे 757 पॉझिटिव्ह
सार्वमत

उच्चांक : नगर जिल्ह्यात करोनाचे 757 पॉझिटिव्ह

करोना पॉझिटिव्हची संख्या 8 हजारांच्या पुढे

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे. गुरूवारी जिल्ह्यात 757 रुग्ण आढळून आले.

यात जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅब 48, अँटीजेन चाचणीमध्ये 402 आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 307 रुग्ण बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 8 हजार झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात करोना टेस्ट लॅब आणि अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून 45 हजार 172 तपासण्या करण्यात आल्या आहेत. काल एकाच दिवशी 757 बाधीत आढळून आल्याने आता उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 2 हजार 976 इतकी झाली असून आतापर्यंत 4 हजार 965 इतकी झाली असून रूग्ण बरे होण्याची टक्केवारी 61.75 एवढी आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये गुरूवारी 38 रुग्ण बाधित आढळून आले. यात श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 17, राहुरी 2, मनपा 5, कॅन्टोन्मेंट 5, पारनेर 5, नेवासा 1, कोपरगाव 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर आणखी 10 जण बाधित आढळून आले. यामध्ये नगर शहर 4, नगर ग्रामीणमध्ये आलमगीर भिंगार 1, श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी 1, कर्जत तालुक्यात राशीन 2, जामखेड शहरात कोर्टगल्ली 1, पाथर्डी तालुक्यात जवखेडे 1 असे रूग्ण आढळून आले.

अँटीजेन चाचणीत काल 402 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 36, संगमनेर 18, राहाता 62, पाथर्डी 40, नगर ग्रामीण 28, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट 10, नेवासा 17, श्रीगोंदा 27,, पारनेर 20, अकोले 01, राहुरी 03, शेवगाव 30, कोपरगाव 61, जामखेड 17 आणि कर्जत 17 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 307 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 264, संगमनेर 9, राहाता 4, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 4, श्रीरामपूर 7, नेवासा 4, श्रीगोंदा 2, पारनेर 4, अकोले 2, राहुरी 2, शेवगाव 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

सहा मृत्यू वाढले

गुरूवारी सायंकाळी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दिलेल्या आकडेवारीत जिल्ह्यातील मृतांच्या आकडेवारीत सहाने वाढ करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीत बुधवारी 88 मृतांची संख्या होती. यात गुरूवारी सहाने वाढ झाली आहे. यामुळे मृतांचा आकडा 94 झाला आहे.

385 रुग्णांना घरी सोडले

गुरूवारी सकाळी 385 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा 189, संगमनेर 31, राहाता 14, पाथर्डी 25, नगर ग्रा.24, श्रीरामपूर 29, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 24, श्रीगोंदा 2, पारनेर 8, अकोले 2, शेवगाव 2, कोपरगाव 3, कर्जत 19 यांचा समावेश आहे. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 4 हजार 965 आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com