नगर जिल्ह्यात आणखी 417 करोना रुग्ण वाढले
सार्वमत

नगर जिल्ह्यात आणखी 417 करोना रुग्ण वाढले

मृतांची संख्या दोनने वाढली, बाधित 15 हजार 334, उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 2 हजार 988

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात गुरूवारी 417 आणखी करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आता 15 हजार 334 झाली आहे. यासह करोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 193 झाली असून मृतांच्या आकडेवारीत दोनची भर पडली आहे. दरम्यान करोनावर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 2 हजार 988 झाली आहे.

जिल्ह्यात करोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने 12 हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 153 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता 79.25 टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 71, अँटीजेन चाचणीत 245 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 101 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 46, संगमनेर 3, नगर ग्रामीण 4, कॅन्टोन्मेंट 3, पारनेर 3, अकोले 8, जामखेड 1, कर्जत 1 आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 245 जण बाधित आढळून आले.

यामध्ये, मनपा 8, संगमनेर 8, राहाता 23, पाथर्डी 17, नगर ग्रामीण 28, श्रीरामपूर 18, कँटोन्मेंट 9, नेवासा 16, श्रीगोंदा 25, पारनेर 15, अकोले 12, राहुरी 13, शेवगाव 12, कोपरगाव 18, जामखेड 21 आणि कर्जत 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 101 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

यामध्ये, मनपा 49, संगमनेर 18, राहाता 02, नगर ग्रामीण 12, श्रीरामपूर 2, पारनेर 4,अकोले 5, शेवगाव 1, कोपरगाव 4 आणि जामखेड 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल 506 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला.

एक लाखांपुढील बिलाचे ऑडिट : द्विवेदी

जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोव्हिड बाधित रुग्णांकडून उपचारापोटी आकारण्यात येणार्‍या बिलाची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास या बिलाची प्रथमतः नेमणूक करण्यात आलेल्या भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तपासणीअंती निश्चित होणारी बिलाची रक्कम संबंधित रुग्णालयास देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोव्हिड बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे शुल्क व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा लाभ इत्यादी बाबतची तपासणी करणे कामी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com