नगर जिल्ह्यात वाढले 609 नवे करोना रुग्ण
सार्वमत

नगर जिल्ह्यात वाढले 609 नवे करोना रुग्ण

बरे झालेल्या रुग्णांची संख्या साडेनऊ हजाराहून अधिक

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज एकूण 512 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 9505 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 73.86 टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 609 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3211 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 242, अँटीजेन चाचणीत 207 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 160 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223, संगमनेर 1, पाथर्डी 1, नगर ग्रामिण 4, श्रीरामपूर 6, कॅन्टोन्मेंट 04, अकोले 1, शेवगाव 1, मिलीटरी हॉस्पिटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 207 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर 31, राहाता 14, पाथर्डी 13, श्रीरामपुर 17, नेवासा 21, श्रीगोंदा 09, पारनेर 11, अकोले 15 राहुरी 07, शेवगाव 17, कोपरगाव 18, जामखेड 13 आणि कर्जत 21 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 160 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 89, संगमनेर 12, राहाता 04, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 26, श्रीरामपुर 04, नेवासा 02, श्रीगोंदा 01, पारनेर 04, अकोले 03, राहुरी 02 कोपरगाव 01, जामखेड 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण 512 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 193, संगमनेर 18, राहाता 16, पाथर्डी 61, नगर ग्रा. 25, श्रीरामपूर 31, कॅन्टोन्मेंट 21, नेवासा 9, श्रीगोंदा 21, पारनेर 14, अकोले 19, राहुरी 17, शेवगाव 6, कोपरगाव 20, जामखेड 5, कर्जत 36 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 9505

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 3211

* मृत्यू : 153

* एकूण रूग्ण संख्या :12869

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com