नगर जिल्ह्यात 703 करोना बाधितांची रुग्णसंख्येत भर

नगर जिल्ह्यात 703 करोना बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज तब्बल एक हजार 55 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 31 हजार 191 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 86.37 टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 703 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4338 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 111, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 222 आणि अँटीजेन चाचणीत 370 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 48, संगमनेर 03, नगर ग्रामीण 12, श्रीरामपूर 01, कँटोन्मेंट 04, नेवासा 02, श्रीगोंदा 10, पारनेर 01, अकोले 01, राहुरी 04, शेवगाव 20, जामखेड 03 आणि मिलिटरी हॉस्पिटल 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 222 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 62, संगमनेर 12, राहाता 16, पाथर्डी 11, नगर ग्रामीण 14, श्रीरामपुर 14, नेवासा 13, श्रीगोंदा 04, पारनेर 12, अकोले 04, राहुरी 37, शेवगाव 03, कोपरगाव 03, जामखेड 16 आणि कर्जत 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 370 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 19, संगमनेर 19, राहाता 55, पाथर्डी 36, नगर ग्रामीण 30, श्रीरामपूर 12, नेवासा 17, श्रीगोंदा 05, पारनेर 16, अकोले 41, राहुरी 32, शेवगाव 01, कोपरगाव 39, जामखेड 31 आणि कर्जत 17 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज तब्बल 1055 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामध्ये मनपा 352, संगमनेर 32, राहाता 118, पाथर्डी 34, नगर ग्रा 96, श्रीरामपूर 71, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 58, श्रीगोंदा 33, पारनेर 41, अकोले 33, राहुरी 68, शेवगाव 10, कोपरगाव 34, जामखेड 33, कर्जत 25 आणि मिलिटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 31191

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 4338

* मृत्यू : 586

* एकूण रूग्ण संख्या : 36115

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com