नगर जिल्ह्यात 13 मृत्यूंसह 681 नवे करोना बाधित

करोना पॉझिटिव्हची संख्या 14 हजार 267 । मृतांची संख्या 181
नगर जिल्ह्यात 13 मृत्यूंसह 681 नवे करोना बाधित

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोना बाधितांची वाटचाल आता 15 हजारांच्या टप्प्याच्या दिशेने सुरू झाली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या 14 हजार 267 झाली होती. यात काल नव्याने

681 रुग्णांची भर होती. तर मृतांचा सरकारी आकड्यात देखील 13 ने वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोना बळींची संख्या आता 181 झाली आहे. तर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 2 हजार 961 आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कालपर्यंत करोनावर मात करत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 11 हजार 125 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 77.98 टक्के इतकी आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 117, अँटीजेन चाचणीत 354 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 210 रुग्ण बाधित आढळले.

बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 77 पाथर्डी 3, नगर ग्रामीण 06, श्रीरामपुर 1, भिंगार कॅन्टोन्मेंट 3, नेवासा 2, श्रीगोंदा 1, अकोले 10, राहुरी 4, शेवगाव 1, कोपरगाव 3, जामखेड 1 आणि मिलिटरी हॉस्पिटल 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 354 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 98, संगमनेर 24, राहाता 29, पाथर्डी 13, श्रीरामपुर 15, भिंगार कँटोन्मेंट 16, नेवासा 5, श्रीगोंदा 26, पारनेर 32, राहुरी 3, कोपरगाव 52, जामखेड 32 आणि कर्जत 9 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 210 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 139, संगमनेर 5, राहाता 6, नगर ग्रामीण 16, श्रीरामपुर 2, कँटोन्मेंट 11, नेवासा 8, श्रीगोंदा 4, पारनेर 9, राहुरी 2, शेवगाव 2, कोपरगाव 1, जामखेड 2 आणि कर्जत 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगीमध्ये निगेटिव्ह तर सरकारीमध्ये पॉझिटिव्ह

नगर शहरातील पाईपलाईन 46 वर्षाच्या महिलेने 16 ऑगस्टला रात्री 8.30 वाजता करोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या सरकारी प्रयोग शाळेत दिलेला स्त्राव नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र हा अहवाल येण्यास उशीर होईल, या शंकेने 17 ऑगस्टला सकाळी 11.57 ला एका खासगी करोना तपासणी प्रयोग स्त्राव नमुना तपासणीसाठी दिला. यात खासगी प्रयोग शाळेचा संबंधीत महिलेचा करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला असून सरकारी प्रयोग शाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आहे. यामुळे आता संबंधीत महिलेचा कोणता अहवाल खरा आणि कोणता चुकीचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सारांश

* बरे झालेली रुग्ण संख्या 11 हजार 125

*उपचार सुरू असलेले रूग्ण 2 हजार 961

*मृत्यू 181

*एकूण रूग्ण संख्या 14 हजार 267

आणखी 505 घरी

मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील 505 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात मनपा 230, संगमनेर 24, राहाता 35, पाथर्डी 34, नगर ग्रामीण 25, श्रीरामपूर 25, भिंगार कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 19, श्रीगोंदा 18, पारनेर 5, अकोले 4, राहुरी 15, शेवगाव 13, कोपरगाव 13, जामखेड 8, कर्जत 21, मिलिटरी हॉस्पिटल 1,इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com