अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात बुधवारी नव्याने 337 जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. उपचारानंतर बुधवारी 271 रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या 1 हजार 820 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी करोना उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयानुसार 131, खाजगी प्रयोगशाळेनुसार 182, तर अँटीजेन चाचणीत 24 जणांना करोना संसर्गाचे निदान झाले.

जिल्हा रुग्णालयानुसार मनपा 52, अकोले 4, जामखेड 3, कर्जत 2, कोपरगाव 18, नगर ग्रामीण 6, नेवासा 4, पारनेर 7, पाथर्डी 4, राहाता 18, राहुरी 3, शेवगाव 7, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेनुसार मनपा 43, अकोले 3, जामखेड 1, कर्जत 1, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 3, नेवासा 9, पारनेर 3, पाथर्डी 2, राहाता 31, राहुरी 6, संगमनेर 39, शेवगाव 2, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 19, कॅन्टोन्मेंट 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीनुसार मनपा 8, जामखेड 1, नगर ग्रामीण 2, नेवासा 4, पारनेर 1, पाथर्डी 2, राहाता 4, राहुरी 1, इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.