संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

अहमदनगर जिल्ह्याची कामधेनु असणार्या व आशिया खंडात अग्रगण्य असणार्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत आघाडी घेतली असून बिगरशेती मतदार संघाकरीता संगमनेर तालुक्यातून झालेल्या एकूण 231 मतदानापैकी 2 मयत 229 पैकी 228 मतदान झाले आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेवर महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. संगमनेर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून अॅड. माधवराव कानवडे व भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदार संघातून गणपतराव सांगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

काल मेहेर विद्यालय येथे झालेल्या या मतदानात बिगर शेती मतदारसंघाकरता 231 मतदार संगमनेर तालुक्यात होते. यापैकी दोन मयत असून 229 पैकी 228 मतदान झाले आहे. सकाळी 11 वाजता महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. संगमनेर तालुक्यातील मतदान हे नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली असून यामुळे महाविकास आघाडीतील उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळाला आहे.

याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातूनही महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाला निर्विवाद वर्चस्व मिळवले असून नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कुशल व समृद्ध नेतृत्वाखाली कामकाज होणार आहे.

काल संगमनेर तालुक्यात जिल्हा बँकेसाठी शांततेत मतदान झाले. विशेष म्हणजे दुपारी 3.00 वाजेपर्यंत संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. बिगर शेती मतदारसंघा करता पतसंस्था, स्वयंरोजगार संस्था, गृहनिर्माण संस्था, पगारी नोकरदार संस्था, मजूर संस्था, औद्योगिक संस्था यांचा समावेश आहे.