जिल्हा बँकेकडून व्याज परतावे देण्यास सुरुवात

जिल्हा बँकेकडून व्याज परतावे देण्यास सुरुवात

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

नियमीत पिक कर्जाची (Crops Loan) वेळेवर परतफेड (Repayment) करणार्‍या शेतकर्‍यांना जिल्हा बँकेकडून (District Bank) गेल्या दोन वर्षाचे व्याजाचे (Intrest) परतावे देण्यात आले नव्हते. दैनिक सार्वमतमध्ये या मथळ्याचे वृत्त प्रकाशित होताच बँकेने केंद्र शासनाकडून मिळालेले 2018-19 व 2019-20 या दोन वर्षाचे 3 टक्के व्याज (Intrest) परतावे शाखा व सोसायट्यांकडे वर्ग केले असून या आठवड्यात शेतकर्‍याच्या बचत खात्यावर या रकमा जमा होणार आहेत.

शेतकर्‍यांची कामधेनू समजल्या जाणार्‍या जिल्हा बँकेने (District Bank) 2022 हे वर्ष वसुली (Recovery) वर्ष म्हणून जाहीर केले आहे. तसेच 31 मार्च 2022 पर्यंत सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून वाटप केलेल्या कर्जाचे 100 टक्के व्याज वसुल करण्याचे उद्दीष्ठ बँकेच्या शाखांसह सेवा सोसायट्यांना देण्यात आले आहे. शासनाने शुन्य टक्के व्याजाने पिक कर्जाची (Crops Loan) घोषणा केली असतांना गेल्या दोन वर्षापासून पोटाला चिमटा घेवून, नैसर्गिक समस्यांना सामोरे जावून नियमीत कर्ज (Loan) भरूनही शेतकर्‍यांना बँकेकडून व्याजाचे परतावे देण्यात आलेले नव्हते. दै. सार्वमतमध्ये 8 जानेवारीच्या अंकामध्ये जिल्हा बँकेकडून मार्चअखेर 100 टक्के व्याज वसुलीचे उद्दीष्ठ, मात्र शेतकर्‍यांना दोन वर्षाचे व्याजाचे परतावे नाहीत. या मथळ्याचे वृत्त प्रकाशीत होताच, बँकेकडून व्याज (Bank intrest) परतावे देण्यास सुरूवात झाली आहे.

शेतकर्‍यांकडून वसुल केलेल्या 6 टक्के व्याजापैकी 3 टक्के राज्य सरकार व 3 टक्के केंद्र सरकार प्रोत्साहन म्हणून शेतकर्‍यांना परत देते. यापैकी बँकेला केंद्र सरकारकडुन मिळालेले 2018-19 व 2019-20 या दोन वर्षाचे3 टक्के व्याज परताव्यांच्या रकमा बँकेने संबंधीत शाखा व सेवा सोसायट्यांकडे पाठविल्या असून आठवडाभरात सभासदांच्या खात्यावर जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सभासद व शेतकर्‍यां मधुन समाधान व्यक्त होत आहे.

सध्या केंद्राचे तिन टक्के व्याज परतावा मिळाला असला तरी राज्याकडील गेले दोन वर्ष व चालू एक वर्ष अशा तिन वर्षाचा तिन टक्के व्याज परतावा बाकी आहे. राज्य सरकारनेही तो तातडीने द्यावा व बँकेने त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com