जिल्हा बँकेने शेतकर्‍यांची अडवणूक करू नये - मापारी

जिल्हा बँकेने शेतकर्‍यांची अडवणूक करू नये - मापारी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

जिल्हा सहकारी बँक लोणी खुर्द, ता. राहाता या शाखेच्या कार्यक्षेत्रातील लोणी खुर्दसह आडगाव बुद्रुक, आडगाव खुर्द, गोगलगाव, पिंपरी लोकाई गावातील शेतकर्‍यांकडून सेवा संस्थेच्या माध्यमातून भरलेला पिकविमा जवळपास 20 लाख रुपये शाखेत जमा झाला आहे. संबंधित पिकविमा रक्कम बँकेने शेतकरी थकबाकीत नसताना कर्ज खात्यात जमा झाले केले असून बँकेने ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी केली आहे.

जिल्हा बँकेच्या सर्व शाखेच्या शेतकर्‍यांचा पीक विम्याच्या रकमा दोन महिन्यांपूर्वीच शेतकर्‍यांना अदा झालेल्या आहेत. लोणी खुर्द शाखेला उशिरा रक्कम मिळाली आहे. ही रक्कम शाखेतील शेतकर्‍यांच्या सेव्हींग खात्यावर वर्ग होणे आवश्यक होते. मात्र बँकेने पीकविमा रक्कम कर्ज खात्यात वर्ग केल्याने शेतकर्‍यांकडून तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दिवाळी सण आठ दिवसांवर असताना तसेज अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खरीप हंगाम पाण्यात गेल्याने अतोनात नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत सण तोंडावर असताना लोणी खुर्द सेवा संस्थेच्या 86 सभासद शेतकर्‍यांचे जवळपास 10 लाख 46 हजार रुपये थकबाकीत नसताना कर्ज खात्यात वर्ग झालेले आहेत. सदर बाब अतिशय गंभीर असून निषेधार्ह आहे. लोणी खुर्द यांच्याकडे विचारणा केली असता सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. सणासुदीच्या तोंडावर थकबाकीत नसताना शेतकर्‍यांचे पीकविम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा केले ते पैसे तात्काळ शेतकर्‍यांना वर्ग करावेत, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com