अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा बँकेच्या 21 संचालकांपैकी 17 जागा आधीच बिनविरोध झालेल्या आहेत. उर्वरित चार जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून

यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी मतदान केंद्र निश्चित केले आहेत. या मतदान केंद्रात सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळी मतदानाची प्रक्रिया होणार आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नगर, कर्जत आणि पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघ आणि बिगर शेती मतदारसंघ या चार मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान बँकेचा सभासद असणार्या मतदारांना राज्य निवडणूक प्राधिकरण यांनी ठरवून दिलेल्या ओळखपत्रानुसार ओळख पटवून देऊन मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या मतदान केंद्रात अकोले येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली, जामखेडसाठी जिल्हा परिषद शाळा सेमी इंग्रजी मुले, कोपरगावसाठी नगर पालिका शिक्षण मडळ शाळा नंबर 6 स्टेट बँकेसमोर, नगर शहरात राष्ट्रीय पाठशाळा, नेवासा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा खुर्द, पारनेरसाठी न्यू इंग्लिश स्कूल पारनेर, पाथर्डी जिल्हा परिषद शाळा नाथनगर, पाथर्डी, राहात्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितळी रोड, राहुरीसाठी विद्यामंदिर प्रशाळा, संगमनेरसाठी भिकाजी तुकाराम मेहेर विद्यालय, विद्यानगर, शेवगावसाठी आदर्श विद्यामंदिर, श्रीगोंदा जिल्हा परिषद शाळा मुली आणि श्रीरामपूर दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा या मतदान केंद्रांचा समावेश आहे.