अहमदनगर (प्रतिनिधी) -

कारखानदारांची असणारी जिल्हा बँक ही शेतकर्यांची बँक केली. खेळते भांडवलच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकर्यांना

आधार दिला. 140 कोटींचे कर्ज वाटप केले. 109 ठरावांपैकी 100 पेक्षा जास्त ठराव हे माझ्याबरोबर असल्याने माझा विजय पक्का असल्याचे सांगत गेल्या दहा वर्षापासून बिनविरोध निवडून येत आहे. दरपंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधकांकडून विरोधाला विरोध केला जात आहे. माझ्या विरोधात उमेदवार शोधण्याचे विरोधकांवर वेळ आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शुक्रवारी माजी आ. कर्डिले यांनी 109 पैकी 100 पेक्षा जास्त मतदारांसह सर्थकांसमवेत शक्तीपदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. बाजार समितीतील संपर्क कार्यालय येथून जिल्हा बँकपर्यंत शक्तीप्रदर्शन केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवाजी कर्डिले म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नगर तालुययातील 109 सोसायटी पैकी 100 ठराव आपल्याकडे असल्यामुळे बँकेच्या निवडणुकीत विजय पक्का आहे. केलेल्या विकासकामांची पावती म्हणून दहा वर्षापासून बिनविरोध निवडून येत आहे.

जिल्हा बँकेत संचालक झाल्यापासून शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत. शेतकर्यांना गायी, म्हशी घेण्यासाठी तर महिलांना लघुउद्याग चालू करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अर्थ सहाय्य केले आहे. महाआघाडीकडे फक्त नऊच सोसायटया शिलक राहिल्या आहेत तरी सुध्दा कर्डिले यांना बिनविरोध निवडून येवू द्यायचे नाही म्हणून ते विरोधाला विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल केला. नुकत्याच झालेल्या 59 ग्रामपंचायती च्या निवडणुकीत 45 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.