अकोले |प्रतिनिधी| Akole

सोसायटी मतदार संघातुन जिल्हा बँकेचे मावळते अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोले तालुक्यातुन सोसायटी मतदार संघातून अर्ज दाखल केलेले ज्येष्ठ नेते दशरथ सावंत आणि अगस्ति कारखान्याचे संचालक सुरेश गडाख या दोघांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा आज पत्रकार पारिषदेत केली. त्यामुळे गायकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

नाशिक येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर सावंत, गडाख यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अगस्ति कारखाना निवडणूकीसाठी अजित पवार यांनी आ.डॉ.लहामटे यांचे नेतृत्वाखालील भविष्यात होणाऱ्या पॅनलला मदत करण्याचा शब्द दिल्यामुळे आम्ही माघार घेत असल्याचा खुलासा सावंत व गडाख यांनी केला आहे.