अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा बँकेच्या चार जागांसाठीची मतमोजणी तालुकानिहाय होणार आहे. यामुळे शेती पूरक मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला कोणत्या तालुक्यातील किती मते मिळाली,

याचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोणत्या तालुक्यातून कोणी दगाफटका दिला हे यातून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, मतदानाच्या दोन दिवसत आधी निवडणुकीतील एका गटाकडून मतदानानंतर होणारी मतमोजणी सर्व तालुक्यातील मतपत्रिका एकत्र करून होणार असल्याची वार्ता पसरवून विरोधी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.

सर्व मतपत्रिका एकत्र केल्यावर कोणत्या तालुक्याने कोणाला मतदान केले हे समजणार अशी साद घालण्यात येत होती. मात्र, मतदानाच्या अगोदरच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी तालुकानिहाय मतमोजणीचा निर्णय घेतला.

मोजणीसाठी 20 कर्मचारी

मतमोजणीसाठी सहकार विभागातील 20 अधिकारी-कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. मतमोजणीवेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. बँकेची निवडणुक भयमुक्त व निपक्षपातीपणे आणि करोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक ती खबरदारी घेवुन सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सहकार विभागाने घेतलेली आहे.