अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमदेवारी माघारीसाठी आता कार्यालयीन चारच दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, शुक्रवारी बँकेच्या

संचालक मंडळासाठी शेती पूरक आणि बिगर शेती मतदारसंघातून भानुदास मुरकुटे यांनी माघार घेतली आहे. मात्र, त्यांचा श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघ आणि ओबीसी मतदारसंघातील उमेदवारी अर्ज शिल्लक आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया होणार आहे. तत्पूर्वी पुढील आठवड्यात 11 तारखेपर्यंत माघारीसाठी मुदत आहे. बँकेच्या 21 संचालकांच्या पदासााठी 195 उमेदवारी अर्ज दाखल आहे. यातील दोन जागा बिनविरोध झालेल्या असून 193 उमेदवारांपैकी मुरकुटे यांनी काल शेती पूरक आणि बिगर शेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज काढून घेतला आहे. मात्र, त्यांचे दोन मतदारसंघात अर्ज शिल्लक आहेत.

पुढील आठवड्यात सोमवारपासून उमेदवारी अर्ज माघारीसाठी केवळ चार दिवस शिल्लक राहणार असून खर्याअर्थाने सोमवारपासून बँकेच्या निवडणुकीसाठी वेगवान राजकीय घडमोडी घडणार आहेत. बँकेचे संचालक मंडळ बिनविरोध होणार की निवडणूक होणार याकडे जिल्ह्याचे नव्हे, राज्याचे लक्ष लागून आहे.

तर 12 तारखेला चिन्हांचे वाटप

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 11 तारखेपर्यंत माघारीसाठी मुदत आहे. या दिवशी 21 संचालक वगळता अन्य उमेदवारांची माघार झाल्यास बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, अन्यथा 12 तारखेला चिन्हांचे वाटप करण्यात येणार असल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.