जिल्हा बँक निवडणूक : आजी-माजी आमदारांसह आणखी 68 उमेदवारी अर्ज

राजळे, कर्डिले, मुरकुटे, घुले, लंके, म्हस्के, नागवडे या दिग्गजांचा समावेश
जिल्हा सहकारी बँक
जिल्हा सहकारी बँक

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी दिग्गज उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली. यावेळी 21

उमेदवारांचे 68 अर्ज दाखल झाले असून बँकेच्या संचालक मंडळासाठी आतापर्यंत 106 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून 644 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेलेले आहेत. सोमवार उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.

शुक्रवारी दाखल अर्जामध्ये पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे, पारनेरचे आ. नीलेश लंके, राहुरीचे माजी आ. शिवाजीराव कर्डिले, श्रीरामपूरचे ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे, शेवगाव-पाथर्डीचे माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, राहत्याचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के, श्रीगोंदा साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, नेवासाचे माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह काही विद्यमान संचालक यांचा समावेश आहे. शुक्रवारी बँकेच्या संचालक पदासाठी 184 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेले असून यामुळे आतापर्यंत 644 अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली. तर आतापर्यंत 106 अर्ज दाखल झाले असून शुक्रवारी त्यातील 68 अर्जाचार समावेश आहे.

काल दाखल अर्जामध्ये माजी कर्डिले यांचे नगर तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून पाच तर पद्मावती संपत म्हस्के यांचा एक अर्ज दाखल आहे. कर्जतमधून विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून कैलास शेवाळे यांचा, पारनेर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून आ. लंके यांचे दोन, विद्यमान संचालक उदय शेळके यांचा एक आणि सुजीत झावरे पाटील यांच्या एका अर्जाचा समावेश आहे. पाथर्डी सोसायटी मतदारसंघातून मोनिका राजळे यांचे दोन तर मथुराबाई वाघ यांचा एक अर्ज दाखल झाला. राहाता सोसायटी मतदारसंघातून अण्णासाहेब म्हस्के यांचे दोन, राहुरी सोसायटी मतदारसंघातून अरूण तनपुरे, सुरेश बानकर, तान्हाजी ढसाळ यांचे अर्ज दाखल झाले.

शेवगाव सोसायटी मतदारसंघातून चंद्रशेखर घुले पाटील यांचे दोन अर्ज, श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र नागवडे, श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघातून भानुदास मुरकुटे यांचे दोन, दीपक पटारे यांचे दोन अर्ज दाखल झाले. शेतीपूरक मतदारसंघातून मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, रावसाहेब पाटील शेळके यांचे दोन अर्ज, तान्हाजी धसाळ, सुरेश पठारे, राजेंद्र नागवडे आणि गणपतराव सांगळे यांचे उमेदवारी अर्ज झाले आहेत.

बिगर शेती मतदारसंघातून मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रवींद्र बोरावके, शामराव निमसे, शिवाजी डौले, पाडूरंग अंभग, सुवर्णा सोनवणे, सचिन गुजर, महिला राखीव मतदारसंघातून आशा तापकिर, जयश्री औटी, पद्मावती म्हस्के, सुवर्णा सोनवणे, अनुजाती/जमाती मतदारसंघातून नंदकुमार डोळस, ओबीसी मतदारसंघातून काकासाहेब तापकीर, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, सुरेश करपे, रवींद्र बोरावके, पांडूरंंग अभंग, भगवान फुलसौंदर, अनिल शिरसाठ, तान्हाजी धसाळ, कैलास शेवाळे, दीपक पटारे, केशव बेरड, सचिन गुजर, अरूण पानंसबळ यांचे अर्ज दाखल झाले आहेत. विमुक्त जाती/भटक्या जमाती मतदारसंघातून गणपतराव सांगळे, बिडगर आशिष, अभय आव्हाड यांचा समावेश आहे.

.....................

जिल्हा बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर असणार्‍या स्वतंत्र विभागात जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे. या ठिकाणी असणार्‍या सभागृहात उमेदवारी दाखल करण्यात येत असून त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत गर्दी होती. या ठिकाणी माजी तथा विद्यमान संचालक शिवाजी कर्डिले त्यांच्या नगर तालुक्यातील 109 विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील मतदारांपैकी 100 मतदारांना घेवून शक्ती प्रदर्शन करत उमदेवारी दाखल करण्यासाठी आले होते.

....................

अद्याप कोपरगाव, राहाता, नेवासा, कर्जत-जामखेड, संगमनेर यासह अन्य तालुक्यातील बड्या नेत्यांचे उमदेवारी अर्ज दाखल होणे बाकी आहे. यासह विद्यमान मंत्री शंकरराव गडाख यांच्या उमदेवारीसाठी शुक्रवारी अर्ज नेण्यात आलेला आहे. सोमवारी अखेरच्या दिवशी या तालुक्यातील बड्या नेत्यांचे अर्ज दाखल होणार आहेत.

.................

शुक्रवार अखेर जिल्हा बँकेसाठी

106 अर्ज दाखल

सोमवार अखेरचा दिवस

आतापर्यंत 644 उमेदवारी अर्जांची विक्री

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com