जिल्हा बँकेकडून सीएम फंडाला 1 कोटीची मदत

जिल्हा बँकेकडून सीएम फंडाला 1 कोटीची मदत

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कामधेनू असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने बुधवारी मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांची मदत दिली. बँकेच्या पदाधिकार्‍यांनी मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द केला.

वाढत्या करोना संसर्गामुळे राज्यातील सामान्य जनजीवन बाधित झाले आहे. मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असून दुसरी लाटेने ही भयंकर स्वरूप धारण केले आहे. या राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्ताना सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या दृष्टिकोनातून नगर जिल्हा बँके मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला.

काल मुंबई येथे बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार व महसूल मंत्री थोरात यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मंत्री विश्वजित कदम, बँकेचे चेअरमन उदयराव शेळके व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, आ. संचालक आशुतोष काळे शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, विवेक कोल्हे, गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com