लंपीमुळे जिल्ह्यातील जनावरांचे दोन दिवसात सर्वेक्षण

सुनील गडाख : पशूसंवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नेवासा तालुक्यातील चार गावांमध्ये आढळलेला जनावरांमधील लंपी स्किन डिसीज या आजाराबाबत जिल्ह्यातील इतर तालुक्यांनी

सर्व्हेक्षण करून अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिल्या. शुक्रवारी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची ऑनलाइन सभा सभापती गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व जनावरांना लाळखुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. सर्व जनावरांना कानाला बिल्ले मारण्यात येऊन लसीकरणाची नोंद ईनाफ प्रणालीवर ऑनलाईन करन्याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत.

राष्ट्रीय कत्रिम रेतन कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये अहमदनगर जिल्हयाचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला असून जिल्हयाचे काम 184 टक्के झालेले आहे. 9 ऑगस्टपासून या योजनेचा दुसरा टप्पा सुरु झालेला असून या टप्प्यामध्ये 500 गावांची निवड केली आहे.

या वेळीही जिल्हयाचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक येईल या करिता सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन सभापती गडाख यांनी केले. सभेस समितीचे सदस्य वंदना लोखंडे, शांताबाई खैरे, सोनाली रोहमारे, दिनेश बर्डे, रावसाहेब कांगुणे, सुनिता दौंड यांनी व्हिडिओ कॉलव्दारे सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com