जिल्हा रूग्णालयात आणखी 25 आयसीयू बेड्सची व्यवस्था कार्यान्वीत
सार्वमत

जिल्हा रूग्णालयात आणखी 25 आयसीयू बेड्सची व्यवस्था कार्यान्वीत

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे आता करोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आणखी 25 सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था ही यंत्रणा कार्यान्वीत झाल्याने गंभीर रुग्णावर आता तात्काळ उपचार मिळणार आहे.

रूग्णालयात एकूण 56 आयसीयू बेड्सची व्यवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी ही व्यवस्था लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ कारवाही करून वेळेत हे काम पूर्ण केले आणि येथील आयसीयू यंत्रणा वेळेत कार्यान्वित केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com