106 करोना पॉझिटिव्हची वाढ

जिल्ह्याचा आकडा 1 हजार 677 : अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 614
106 करोना पॉझिटिव्हची वाढ

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात रविवारी नव्याने 106 करोना रुग्णाची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 1 हजार 677 झाला आहे. बाधित आढळून आलेल्यामध्ये सरकारी प्रयोग शाळेतील 47 तर खासगी प्रयोग शाळेतील 59 अहवालाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 614 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॉबमधून आलेल्या आकडेवारीत जिल्हा रुग्णलयातील करोना टेस्ट लॅबमध्ये रविवारी दिवसभरात 47 जणांचे अहवाल बाधित आढळून आले. यामध्ये नेवासा 8, भिंगार 4, नगर ग्रामीण 6, श्रीगोंदा 9, राहुरी 4, शेवगाव 1, कर्जत 1, संगमनेर 5, नगर शहर 7, श्रीरामपूर 1 आणि मिलिटरी हॉस्पिटल येथील 1 रुग्ण बाधित आढळून आला आहे.

नेवासा तालुक्यातील सोनई येथील 7, तर सलाबतपुर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. भिंगार 4, नगर ग्रामीण सारोळा कासार 1, बुर्हाणनगर 4, टाकळी खतगाव आणि 1 एकाचा समावेश आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ 2, चांडगाव 1, कोळगाव 1, घारगाव 3, अजनुज 1, देवदैठण 1, राहुरी तालुक्यातील राहुरी बुद्रुक 1 आणि देवळाली प्रवरा 3. शेवगाव तालुक्यातील वडगाव आणि कर्जत तालुक्यातून गणेशवाडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यातून राजापूर 1, मालदाड रोड 2, गणेशनगर 1, कुरण 1 येथील एकाचा तर श्रीरामपूर तालुक्यातील 1 आणि नगर शहरातील 5 रुग्णाचा बाधितांमध्ये समावेश आहे.

यासह खासगी प्रयोग शाळेचा अहवाल 59 आले आहेत. यामुळे गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 106 करोना रुग्णांची जिल्ह्याच्या आकडेवारीत भर पडली आहे. सध्या उपचार सुरू असणार्‍यांच्या संख्या 614 झाली असून एकूण रुग्ण संख्या 1 हजार 677 झाली असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी यांनी दिली.

उपचार सुरू असलेले रुग्ण : 614

बरे झालेले रुग्ण : 1025

मृत्यू : 38

एकूण रुग्ण संख्या : 1677

नगर शहरातील एका जुन्या नामवंत 70 वर्षीय डॉक्टरांना करोनाची बाधा झाली आहे. संबंधीत डॉक्टरांचा करोनाचा सरकारी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नगरच्या आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. करोना बाधितांवर उपचार करणार्‍या या नामवंत डॉक्टरांना आता स्वत:वर उपचार करावे लागणार आहे. सध्या संबंधीत डॉक्टरांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com