अबब ! 24 तासात जिल्हयात ‘एवढ्या’ रूग्णांची नव्याने भर
सार्वमत

अबब ! 24 तासात जिल्हयात ‘एवढ्या’ रूग्णांची नव्याने भर

मृतांच्या संख्येत सहाची वाढ : जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 4 हजार 185

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये करोना बाधितांच्या रूग्ण संख्येत 261 ची वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमध्ये 97, अँटीजेन चाचणीत 24 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या 140 रुग्णांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 1 हजार 404 इतकी झाली आहे.

आतापर्यंत करोनावर उपचार करून घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 2 हजार 721 इतकी झाली. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.02 टक्के आहे. दरम्यान, बुधवारच्या शासकीय आकडेवारीत करोनामुळे मृतांचा आकडा 54 वरून 60 असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शासकीय आकडेवारीत सहा मृतांची वाढ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना तपासणी प्रयोग शाळेतून बुधवारी दुपारी जिल्ह्यात नव्याने 85 रूग्णांची भर पडली होती. यात नेवासा तालुक्यातील भेंडा बु 1, नेवासा खु. 1, नेवासा 1, कुकाणा 1 अशा 4 रुग्णांची. राहुरी तालुक्यातील वांबोरी 1 रुग्ण, जामखेड शहरातील खाडे नगर 1, राहाता शहरात 2, तर शिर्डी 2, दाढ बु 2 असे 4 रुग्ण. भिंगारमध्ये सदर बाजार 1, नेहरू कॉलनी 1, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल 1, महात्मा कॉलनी 1 असे 4 रुग्ण. कर्जत राशीन 6, नागापुर 1, पिंपळवाडी 2, थेरवडी 1 असे 10 रुग्ण.

नगर शहरातील गायकवाड मळा चिंतामणी हॉस्पिटलमागे 2, मिल्ट्री हॉस्पिटल 4, बोरुडे मळा 1 असे 7 रुग्ण. अकोले तालुक्यात राजूर 2, निंबळक 1, माणिक ओझर 10, वागेस 1 असे 14 रुग्ण. कोपरगाव शहर 1 रुग्ण.

पाथर्डी शहरात शेवाळे गल्ली 11, रंगार गल्ली 2, नाथ नगर 1, वामनभाऊ नगर 2, पागोरी पिंपळगाव 1 असे 17 रुग्ण. संगमनेर पावबाकी रोड 2, महात्मा फुले नगर 1,पेमगिरी 5, दाढ 1,विद्यानगर 2, सुतारगल्ली 1, गहीडेकर मळा 1,घोडेकर मळा 1, खर्डी 1,रायते 1,निमगाव पागा 1 असे 17 रुग्ण.

अकोले बाडगी बेलापुर 1,कोतुळ 1 असे दोन रुग्ण. श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा 1 रुग्णांचा यांचा समावेश आहे.त्यानंतर, सायंकाळपर्यंत नव्या 12 बाधीत रूग्णांची भर पडली. यामध्ये, नेवासा शहर 2, शेवगाव शहर 3, कर्जत तालुक्यातील राशीन 5, श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बुधवारी अँटीजेन चाचणीत 24 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, कोपरगाव 1, नेवासा 4, कॅन्टोन्मेंट 1, श्रीरामपूर 10, नगर ग्रामीण 6, राहाता 2 या रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 140 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 101, कर्जत 2, राहुरी 1, अकोले 1, श्रीगोंदा 3, नेवासा 1, कँटोन्मेंट 1, श्रीरामपूर 9, नगर ग्रामीण 3, पाथर्डी 3, राहाता 5, संगमनेर येथील 10 रुग्णाचा समावेश आहे.

आणखी 303 घरी सोडले

दरम्यान, बुधवारी 303 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 9, संगमनेर 106, राहाता 12, पाथर्डी 67, नगर ग्रामीण 6, श्रीरामपूर 23, कॅन्टोन्मेंट 23, नेवासा 32, पारनेर 2, राहुरी 2, शेवगाव 5, कोपरगाव 9, श्रीगोंदा 6 आणि कर्जत येथील 1 रुग्णांस घरी सोडण्यात आले.

आज झेडपी बंद

जिल्हा परिषदेत दोन अधिकारी व 2 कर्मचारी पाझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यातील एका अधिकार्‍याचा मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आठ दिवस झेडपी बंद ठेवावे, अशी मागणी होत होती. या मागणीचा विचार करून प्रशासनाने आज आणखी एक दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याशुक्रवार (ता. 31) ला नियमित कामकाज सुरु राहणार आहे. त्यानंतर पुन्हा शनिवारी ते सोमवार सुट्टी आहे. यामुळे आपोआप जिल्हा परिषदेचे कामकाज तीन दिवस बंद राहणार आहे.

नोडल अधिकारी म्हणून रेड्डी

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा रुग्णालयातील प्रयोग शाळेच्या कामात सुसुत्रता आणण्यासाठी जिल्हा उपवन संरक्षक आदर्श रेड्डी यांची नियुक्ती केली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील करोना चाचणीच्या कामात आणखी सुत्र येणार आहे. यापूर्वी नोडल अधिकारी म्हणून डॉ. बापूसाहेब गाडे काम पाहत होते.

Deshdoot
www.deshdoot.com