संगमनेर, नगर शहर परिसरात करोनाचा विस्फोट

कुरणमध्ये 22, नगर परिसरात 8, श्रीगोंद्यात 5 नव्याने करोना रुग्ण
करोना
करोना

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात रविवारी पुन्हा करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येचा विस्फोट झाल्याचे समोर आले. दिवसभरात दोन टप्प्यात जिल्ह्यात 41 नव्याने करोना रुग्ण समोर आले. यात संगमनेर तालुक्यातील एकट्या कुरण गावात 22 आणि संगमनेर शहरात 1, नगर शहरात 3 आणि लगतच्या परिसरात 5, श्रीगोंदा तालुक्यात 5 नव्याने रुग्ण समोर आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 618 झाला असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 201 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोग शाळेतून रविवारी सकाळी आधी शहरातील सावेडी भागातील 61 वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर काही वेळातच जिल्ह्यात आणखी नव्याने 12 बाधित रुग्ण समोर आले. यात शहरा लगत असणार्‍या नवनागापूर भागातील 3, नगर शहरातील पद्मानगरमध्ये 2, नाईकवाडपुरा (संगमनेर) 1, श्रीरामपूर 1, गवळी वाडा (भिंगार) 2, खेरडा (ता. पाथर्डी) 2, राहाता 1 या रुग्णांचा समावेश होता.

रात्री पुन्हा जिल्ह्यात आणखी 28 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एकट्या कुरण गावात 22 व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील 5 जण बाधित आढळून आले आहेत. निंबेनांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण करोना बाधित आढळला आहे. यामुळे दिवसभरात जिल्ह्यात 41 करोना बाधित आढळून आले असून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 618 वर पोहचला आहे. यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 201 झाली आहे.

संगमनेर 23, नगर शहर 3, भिंगार 2, नवनागापूर 3, पाथर्डी 2, राहाता 1, श्रीरामपूर 1, श्रीगोंदा 5, शेवगाव 1 असे एकूण 41 रुग्ण.

श्रीरामपूरातील नेत्याला करोनाची बाधा झाल्यानंतर या नेत्याच्या पत्नीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तसेच या नेत्याच्या गाडीचा चालकालाही करोनाने घेरले आहे. तो राजूरीत राहतो. त्यामुळे त्यालाही उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले आहे. त्याची पत्नी आणि मुले सोनईला गेले होते. त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले असून त्याचे स्वॅब घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com