अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर 17 जागा गुरूवारी बिनविरोध झाल्या.

मात्र, चार जागांसाठी निवडणूक होणार असून शुक्रवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले.

कर्जत सेवा सोसायटी मतदारसंघातील उमेदवार अंबादास पिसाळ यांना विमान प्रतिस्पर्धी उमेदवार मिनाक्षी सांळुके यांना कपबशी, नगर सोसायटी मतदारसंघातील उमदेवार शिवाजीराव कर्डिले यांना कपबशी प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यभामाबाई बेरड यांना छत्री, पारनेर सोसायटी मतदारसंघातील उमदेवार उदय शेळके यांना कपबशी तर प्रतिस्पर्धी उमेदवार रामदास भोसले यांना विमान, यासह बिगर शेती मतदारसंघातील उमेदवार प्रशांत गायकवाड यांना कपबशी आणि प्रतिस्पर्धी दत्तात्रय पानसरे यांना विमान चिन्ह देण्यात आले आहे.

येत्या 20 तारखेला बँकच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, बिनविरोध झालेल्या जागांमध्ये राष्ट्रवादी आणि थोरात गटाचे बँकेवर वर्चस्व असल्याचे सिध्द झाले आहे.