धनादेशाचा अनादर करणार्‍यास कारावास

पाच लाख 60 हजार रुपये नुकसान भरपाईचे आदेश
धनादेशाचा अनादर करणार्‍यास कारावास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी एकाला अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी श्रीमती वाय. एम. तिवारी यांनी दोषी धरून पाच लाख 60 हजार रुपये दंड करून एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. फिर्यादी कंपनीतर्फे अ‍ॅड. तेजस्विनी काकड यांनी काम पाहिले.

कनगर (ता. राहुरी) येथील शरद भाऊसाहेब घाडगे आणि भाऊसाहेब गोविंद घाडगे यांनी सस्टेनेबल अ‍ॅग्रो-कमर्शियल फायनान्स लि. या कंपनीकडून चार लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले होते. कंपनीने कर्ज रक्कमेची मागणी केली असता शरद घाडगे याने 5 लाख 58 हजार 779 रुपयांचा धनादेश दिला होता. सदरचा धनादेश वटला नाही. त्यामुळे कंपनीने शरद घाडगे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीमध्ये कंपनीतर्फे सुशिल चहाळ यांचा जबाब व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने दंड व शिक्षा ठोठावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com