निळवंडे कालव्यांना वादाचा खळखळाट...नियमभंगप्रकरणी खासदारांवर गुन्हा दाखल होणार?

निळवंडे कालव्यांना वादाचा खळखळाट...नियमभंगप्रकरणी खासदारांवर गुन्हा दाखल होणार?

लोणी/पिंपरी निर्मळ (वार्ताहर) :

#निळवंडे कालवे उत्तर #नगर जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांचे स्वप्न आहे. मात्र या कालव्यांतील अडथळे संपता-संपत नाहीत. निळवंडेच्या अंत्य कालव्यांचे पिंपरी निर्मळ शिवारात नुकतेच भुमीपुजन झाले. मात्र या भुमिपुजनावरून सुरू झालेला वाद संपण्याची चिन्हे नाहीत. एकाच दिवशी दोनदा भूमिपुजन, अडथळ्याप्रकरणी दोघांवर गुन्हा या घटना ताज्या असताना आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे #खासदार_सदाशिव_लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आहे. दरम्यान, हा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करून झाल्याचा दावा खा.लोखंडे समर्थकांकडून होत आहे.

#करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी #आपती_व्यवस्थापन_कायदा आणि #प्रतिबंधात्मक_कायदा लागू केला आहे. मात्र या नियमांचा भंग करून खा.सदाशिव लोखंडे यांच्यासह सुमारे दोनशे ते अडीचशे जणांनी पिंपरी निर्मळ येथे निळवंडे कालव्यांच्या कामाचे भूमीपूजन कार्यक्रमावर #रिपब्लिकन_पार्टी_ऑफ_इंडीयाचे करण विलास कोळगे यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेवून खासदारांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.यासंदर्भात कोळगे यांनी #लोणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये खा.सदाशिव लोखंडे यांच्यासह #निळवंडे_कृती_समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, आण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ गोरे, सौरभ शेळके, विठ्ठल शेळके, शिवाजी शेळके, विलास गुळवे, प्रभाकर गायकवाड यांच्यासह दोनशे ते अडीचशे लोकांनी निळवंडे कालव्यांच्या कामाचा भूमीपूजन समारंभ कार्यक्रम केला.

कोव्हीड संकटाचे पार्श्वभूमीवर #जिल्हाधिकारी आपती व्यवस्थापन कायदा व प्रतिबंधात्मक आदेश लागू करुन सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रमावर बंदी घातली असताना सुध्दा खा.लोखंडे आणि इतरांनी शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीरपणे कार्यक्रमाचे आयोजन करून गर्दी गोळा करून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याने या सर्वाच्या विरोधात आपती व्यवस्थापन कायदा, साथप्रतिबंधात्मक कायदा आणि जमावबंदी आदेशातील फौजदारी कायद्यातील तरतूदी नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोळगे यांनी या तक्रार अर्जात केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही या तक्रारीची प्रत पाठवली असल्याचे कोळगे यांनी सांगितले. मात्र आता त्यांच्या या तक्रारीबाबत प्रशासन काय भुमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

दोघांवर दाखल झाला होता गुन्हा

उत्तर नगर जिल्हयातील जिरायती टापुला वरदान ठरणार्‍या निळवंडेच्या अंत्य कालव्यांचे पिंपरी निर्मळ येेथे भुमीपुजन झाले. त्यावेळी पोकलेन व यंत्र सामुग्री जाण्यासाठी दोंघांनी गाडी आडवी लावून अडथळा आणला होता. याप्रकरणी दोंघांविरोधात लोणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात करण्यात आला आहे.

निळवंडे लाभक्षेत्रातिल शेतकरी गेल्या पन्नास वर्षापासुन धरणाच्या पाण्याची चातका प्रमाणे वाट पाहत आहेत.कालव्यांचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपरी निर्मळ पासून निळवंडेच्या अंत्य कालवा सुरू होतो. या कालव्याची निविदा प्रसिध्द होवुन वर्कऑर्डर झाली आहे. पिंपरी निर्मळ शिवारात अंत्य कालव्याच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी काही लोकांनी कंत्राटदाराची पोकलेन व यंत्र सामुग्री भुमीपुजनाच्या ठिकाणी येण्यास गाडी आडवी लावून अडथळा आणला होता. खा.लोंखडे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. त्यानतंर आडवी वाहने बाजुला करून यंत्रसामग्री भुमीपुजनाच्या ठिकाणी पोहचली होती. लोणी पोलिसांनी एम.एस.कंस्ट्रक्शन कंपनी प्रा.ली.यांचे साईट इन्चार्ज श्रावण तुपे यांच्या फीर्यादीवरून संदीप शंकर गाढे (रा.वाकडी) व करण दिपक माघाडे (रा.लोणी) यांच्या विरोधात कामात अडथळे आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

एका दिवसात दोनदा भुमीपुजन

निळवंडेच्या अंत्य कालव्याचे एका दिवसात दोन कृती समित्यांकडुन दोनदा भुमीपूजन झाल्यानेही या प्रकाराची आहे. सकाळी ज्ञानेश्वर वर्पे अध्यक्ष असलेल्या कृती समितीने आपल्या कार्यकर्त्यार्ंसह पहिल्या कंत्राटदाराच्या यत्रंणेसह भुमीपूजन केले.तर दुपारी नानासाहेब शेळके अध्यक्ष असलेल्या समितीने खा.लोंखडे यांच्या उपस्थितीत दुसर्‍या कंत्राटदाराच्या यंत्रणेसह भुमीपूजन केले.

सरकारचे नियोजन

जून 2022 पर्यत निळवंडे लाभक्षेत्रात पाणी देण्याचे #महाविकास_आघाडी_सरकारचे नियोजन आहे. त्यासाठी #अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मुख्य कालव्याबरोबरच पृच्छ व विविध कालवा शाखांची कामे प्रगतीपथावर आहे. डाव्या कालव्याच्या 85 किलोमीटरच्या पुढील भागाचे टेंडर एका वर्षापूर्वी निघाले होते. हे काम जळगाव येथील एम.एस.कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. मात्र कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक अद्यादेश काढून नविन कामे सुरु न करण्याचे आदेश दिले होते. दोन महिन्यापूर्वी सरकारने या आदेशात शिथिलता आणून काही कामे सुरु करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यापूर्वीच या कालव्याचे काम सुरु होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर पडले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com