
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
व्यवसायातून जमा झालेले एक लाख 35 हजार रूपये व एक लॅपटॉप (Laptop) असा एक लाख 47 हजार रूपयांचा ऐवज असलेली बॅग (Bag) दोन चोरट्यांनी (Theft) बळजबरीने पळवून नेली. पाईपलाइन रोडवर (Pipeline Road) मंगळवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी कृष्णकांत शंकर मडूर (वय 44 रा. तोफखाना) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. फिर्यादी हे हिंदुस्तान युनी लिव्हर कंपनी लि.मध्ये मार्केटिंगचे काम करतात. कंपनीचा माल विक्रीतून जमा झालेले पैसे बॅगमध्ये घेवून ते कंपनीच्या एमआयडीसी (MIDC) येथील कार्यालयात जमा करण्यासाठी जात असता.
मंगळवारी दुपारी ते त्यांच्या दुचाकीवरून पाईपलाइन रोडने पैसे घेवून जात असताना आयोध्यानगर, दत्त मंदिराजवळ स्पीड ब्रेकरमुळे त्यांनी दुचाकीचा स्पीड कमी केला. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादीला आमचा अपघात करतो का?, असे म्हणून शिवीगाळ केली. एकाने त्याच्याकडील चाकूने फिर्यादीच्या पाठिवर असलेल्या बॅगचा बंद कापून बॅग लंपास केली. त्यामध्ये एक लाख 35 हजार रूपयांची रोकड व एक लॅपटॉप होता. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.