VIDEO : कोपरगावात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राडा

VIDEO : कोपरगावात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राडा

कोपरगाव | Kopergoan

कोपरगाव येथे कृष्णाई मंगल कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अर्वतनाच्या तारखा जाहीर न केल्याने शेतकर्‍यांनी बैठकीतच गोंधळ घातला.

शेतकर्‍यांनी विचारलेल्या एकाही प्रश्‍नाला अधिकार्‍यांना उत्तर देता आले नाही. अर्वतनाच्या तारखा राहात्याच्या बैठकीत जाहीर करणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितल्यावर शेतकर्‍यांनी इथे बैठक का घेतली असा सवाल उपस्थित करून आमदार आशुतोष काळे यांच्यासमोरच अधिकार्‍यांना घेराव घातला. या गोंधळात राष्ट्रवादी व भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

VIDEO : कोपरगावात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राडा
करोनाचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन'ची लक्षणे काय?, कशी घ्याल काळजी?

बर्‍याच वेळ तु-तु मै-मै झाल्यावर दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान आर्वतनाच्या तारखा राहाता येथेच जाहीर करावयाच्या होत्या तर मग येथे बैठक कशाला घेतली असा सवाल बैठकीसाठी आलेल्या शेतकर्‍यांनी उपस्थित केला.

VIDEO : कोपरगावात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राडा
जगातील सर्वात जास्त १० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील तीन शहरे
VIDEO : कोपरगावात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राडा
Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय? काय आहे फायदे आणि तोटे?, जाणून घ्या सोप्या शब्दात

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com