स्वस्त धांन्यावरून दोन गटात वाद

स्वस्त धांन्यावरून दोन गटात वाद

परस्परविरोधी फिर्यादी दाखल

शेवगाव | वार्ताहर | Shevgaon

स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्याच्या कारणावरून दोघांनी संगनमताने फिर्यादीची गचांडी पकडुन धान्य देण्यास नकार देवुन जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याची फिर्याद भास्कर सर्जेराव शिरसाठ रा.मठाचीवाडी (सुलतानपुर बुद्रुक)ता.शेवगाव यांनी दिली. त्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात सिताराम श्रीपती करंजे व चकडुबाळ दादा भुमकर दोघेही रा.मठाचीवाडी ता.शेवगाव यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम३/१(४)३ प्रमाणे तसेच भा.द.वि.कलम ३३०,५०४,३४प्रमाणे गु.र.नं.९६४/२०२० गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (दि.२७)रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मठाचीवाडी येथे खरंजे वस्तीवरील भास्कर शिरसाठ हे स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी गेले असता धान्य घेण्याच्या कारणावरून सिताराम करंजे व कडुबाळ भुमकर यांनी भास्कर शिरसाठ यांना धान्य देण्यास नकार देवुन गचांडी पकडून जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे करीत आहेत.

परस्परविरोधी फिर्यादी दाखल

स्वस्त धान्य दुकानातील वडीलांच्या वाट्याचे धान्य देण्यास नकार दिल्याने दुकानदार महिलेचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करुन तुमच्या नवऱ्याची नोकरी घालवितो व तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करतो. असा दम दिल्या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भास्कर सर्जेराव शिरसाठ रा.मठाचीवाडी ता.शेवगाव याच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी गु.र.नं. ९६६/२०२० भा.द.वि कलम ३५४,३२३,५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या बाबत मंगळवारी (दि.२९)रोजी मठाचीवाडी येथे सकाळी१०.३० वा.सुमारास फिर्यादी महिलेच्या स्वस्त धान्य दुकानात भास्कर शिरसाठ यांने वडिलांच्या वाट्याचे धान्य घेण्यासाठी गेला तेंव्हा फिर्यादी त्यास म्हणाली की तुमच्या वडिलांचे रेशनिंग चे धान्य तुमची मुलगी भारती हिचा थम घेतल्या शिवाय देता येणार नाही असे म्हटल्याचा राग आल्याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ दमदाटी करून महिलेचा हात धरुन लज्जास्पद वर्तन करून तुमच्या नवऱ्याची नोकरी घालवितो व तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करतो असा दम दिला. त्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस अटक करण्यात आले आहे. पुढील तपास शहरटाकळी दुरक्षेत्र विभागाचे हवालदार बाळासाहेब ताके करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com