कोपरगावमध्ये दहीहंडीवरून भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज

कोपरगावमध्ये दहीहंडीवरून भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज

कोपरगांव(तालुका प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात बुधवार दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू असलेला स्वागत कमानीचा वाद रात्री अकरा वाजता मिटला आहे असे वाटत असतानाच काळे व कोल्हे गटाकडून झालेल्या घोषणा बाजी मुळे वाद पेटण्याची चिन्हे दिसत असतानाच पोलीस प्रशासनाकडून व दंगल नियंत्रक पोलिस या ठिकाणी पाचारण होऊन गोळा झालेल्या जमावावर पोलीस बळाचा वापर करून हटविण्यात आले यावेळी उपस्थित जमावाची धावपळ उडाली होती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोरील जागेत कोल्हे गटाला व त्याच्या थोडं पुढे भरका देवी आईस्क्रीम पार्लर समोरील जागेत काळे गटाला दहीहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र आज या ठिकाणी काळे गटाच्या वतीने स्वागत कमान लावण्याचे काम सुरू होते यावर कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत पोलीस व नगरपालिका अधिकारी यांना बोलावून घेतले व सदर कमान ज्या ठिकाणी लावत आहे त्या जागेची परवानगी आमच्या कडे आहे तसेच कमान लावण्याची परवानगी नसल्याचे म्हणत सदर कमान काढून घ्यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाला यावेळी कोल्हे गटाने केली.

मात्र याबाबत दिवसभरात दोन्ही गटाला पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी समजावून सांगितले अनेक बैठकही घेतल्या मात्र रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावर मुख्याधिकारी यांनी निर्णय घेत सदर वादग्रस्त कमान उद्या बुधवार दि. 17 रोजी रात्री काढण्याबाबतचे पत्रक पोलीस स्टेशन येथे भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. मात्र त्यांनतर कोल्हे गट व काळे गट छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोर जमले व या ठिकाणी समोरासमोर घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी दोन्ही गटाच्या घोषणाबाजीचे रूपांतर वादात होण्याआधी पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहचले व सदर जमावावर लाठीचार्ज करत जमाव पांगवला.

ज्या कामानिवरून दिवसभर हा वादंग उदभवला होता. ती कमान रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात काढून घेण्यात आली होती. दरम्यान दहीहंडी उत्सव सुरू होण्याच्या अगोदरच स्वागत कमानीवरून वाद पेटल्याचे चित्र कोपरगाव येथे पहावयास मिळत असून मात्र हा वाद यापुढे चिघळण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com