वाद करणार्‍या दोघांना कर्जत पोलीसांकडून अटक

वाद करणार्‍या दोघांना कर्जत पोलीसांकडून अटक

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

जागेच्या कारणावरून नेहमी वाद करणार्‍या दोघांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. कर्जत पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. जागेच्या वादामध्ये मोठा गंभीर गुन्हा घडू शकतो, ही बाब ओळखून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सचिन बापु नेटके (35) व अमोल भीमराव नेटके (25, दोघे रा. भांडेवाडी, कर्जत) यांना अटक करण्यात आली आहे.

या दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्याबाबत व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यामधील सचिन नेटके हा शेजारील लोकांना, नातेवाईकांना जागेच्या वादाचे कारणावरुन मारहाण करुन रस्ते अडवून दमदाटी करून वारंवार शिवीगाळ करत होता. त्याच्याविरुद्ध 4 गुन्हे दाखल झाले आहेत. पुढे गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडू नये म्हणून त्याच्याविरुद्ध सीआरपीसी कलम 107, 110 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com