कोपरगाव (प्रतिनिधी) -

खेळाने व्यायाम होतो. खेळातील शिस्त जीवनाला कलाटणी देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही. संपूर्ण संघाचा विचार

करावा लागतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते. खेळ म्हटले की यश अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार. पण हार ही हसत स्विकारली पाहीजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनाला कलाटणी देते, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त व संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे आणि त्यांच्या मित्र परीवराच्या वतीने संजीवनी सैनिकी स्कूल व तालुका क्रीडा संकुल मैदान, खिर्डी गणेश येथे राज्यस्तरीय सहकार महर्षि शंकररावजी कोल्हे चषक अंतर्गत खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात नितीन कोल्हे बोलत होते. कृषि तज्ज्ञ सुरेश कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर सुमित कोल्हे, चंद्रकांत चांदर, भिमाभाऊ संवत्सरकर, अॅड. संचेती व्यासपीठावर उपस्थित होते. सदर स्पर्धांसाठी राज्यभरातून 60 संघातील 750 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पाच दिवसात एकुण 51 सामने खेळले गेले.

सुमित कोल्हे म्हणाले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी तालुका क्रीडा संकुलाची उभारणी केली. कोपरगांव तालुक्यातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना व्यासपीठ व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उचलुन संजीवनी क्रिकेट अकॅडमीची स्थापना करून राष्ट्रीय खेळाडू घडविण्याची वाटचाल सुरू करीत आहोत. लवकरच आय.पी.एल.च्या धर्तीवर कोपरगांव प्रिमिअर लिग सुरू करून तालुक्यातील खेळाडूंना सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या उपलब्ध असलेला व भविष्यात मिळणारा चार-पाच कोटींचा निधी तालुका क्रीडा संकुल येथेच वापरून अद्यायावत स्टेडियमची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करून खेळाडूंच्या प्रगतीसाठी संजीवनी फाऊंडेशन सर्वोतोपरी पुढे राहील, असे आश्वासन त्यांनी प्रशासनास दिले.

अंतिम सामन्यात मयूरेश्वरी प्रतिष्ठाण, शिंगणापूर प्रथम क्रमांकाचे 31 हजार रुपयांचे बक्षिस व चषक मिळविले. फ्रेंडस् क्लब कोपरगाव हा उपविजेता संघ ठरला. या संघाने 21 हजार रुपयांचे रोख बक्षिस मिळविले. निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथील साई गोविंद संघाने 11 हजारचे तिसरे बक्षिस जिंकले. एस.के. इलेव्हन, कोपरगांव संघ हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघाने 7 हजारचे बक्षिस मिळविले.