दिव्यांगांच्या तक्रारीचे निवारण ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी करणार

दिव्यांगांच्या तक्रारीचे निवारण ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामविकास विभाग अंतर्गत पंचायतराज संस्थेच्या विभाग स्तरावर तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

त्यानुसार आता ग्रामस्तराव ग्रामसेवक तर तालुका स्तराव गटविकास अधिकारी तक्रारींचे निवारण करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आणि दिव्यांगाच्या तक्रारीची योग्य दखल घेयण्याच्या दृष्टीने विभागस्तर, जिल्हा सतर, तालुकास्तर आणि ग्रामस्तरावर दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

त्यासुसार विभागीय स्तरावर उपआयुक्त (विकास), जिल्हा स्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग), तालुका स्तरावर गटविकास अधिकारी आणि ग्रामस्तरावर ग्रामसेवक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com