पोलीस महासंचालकांच्या पथकाचे श्रीरामपुरात जुगार अड्ड्यांवर छापे

2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत
File Photo
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात काल पोलीस महासंचालकांच्या पथकाने जुगार खेळणार्‍या क्लबवर छापा टाकून पोलिसांनी 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात 20 जणांना ताब्यात घेण्यात आले होते तर एक जण पसार आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरात जुगार, मटका, तसेच अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहरात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आहे तसेच पोलीस उपविभागाीय कार्यालय असतानाही शहर पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष असल्याचे यावरून स्पष्ट होते. पोलीस महासंचालकांच्या पथकाने दोन तीन ठिकाणी छापे टाकले. यात तिरट नावाचा पत्याचा जुगार पैसे लावून खेळत असताना पकडले. यात दिनेश मोहनदास माखिजा, चंद्रकांत गोपीनाथ गुडधे, नसीम मुख्तार शेख, अमरजितसिंग, जावेद खलिद मलिक, रोहिदास अडागळे, सुखदेव गांगुडेर्र्, जाफर करीम शेख, जुनेद असलम मेमन, सलमान हसन कुरेशी, समीर शेळके,जैनुद्दीन याकूब शेख, तुषार नाणेकर, राजेश गोसावी,अजमल नासिर शेख, सर्फराज बाबा शेख, अकील शेख, अमजद पठाण यासह अन्य 21 जण तिरट नावाचा जुगार खेळत असताना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 45780 रुपये रोख रक्कम, 63 हजारांचे 15 मोबाईल, 1 लाख 55 हजारांच्या पाच मोटारसायकल असा एकूण 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सुरेश मराठे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 160/2022 प्रमाणे मुंबई जुगार अ‍ॅक्ट 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com