चिमुकल्यांनी साकारली किल्ल्याची प्रतिकृती

चिमुकल्यांनी साकारली किल्ल्याची प्रतिकृती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विनायकनगर येथील वैष्णवदेवी बाल मित्र मंडळाच्या मुलांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर किल्ल्याची प्रतिकृती बनविली. किल्ला बनविण्यासाठी दिनेश शिंगवी, अभिनंदन गुंदेचा, भावेश गांधी, विश्वजीत धोंडे, दर्शन भंडारी, सोहम वडे, राहुल चौधरी यांनी परिश्रम घेतले तर सौ.मनिषा पारस गुंदेचा यांचे सहकार्य लाभले.

हा किल्ला 5 बाय 6 फूट असून 4 फूट उंचीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती ठेवण्यात आली असून, किल्यात 740 मावळे, प्राणी संग्राहलय, शामियाना, आखाडा, धरण, बाजारपेठ, तटबंदी, तरवाजा, तोफगोळे, बुरुजांची आकर्षक मांडणी केली आहे.

बाजारात विक्रीस आलेले रेडिमेड बनवलेले किल्ले हे चिमुकल्यांसाठी आकर्षक ठरत आहे. त्यामुळे त्यास चिमुकल्यांनी पसंती दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com