डिंभे ओव्हरफ्लो; घोडमधून विसर्ग वाढविला

डिंभे धरण
डिंभे धरण

कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटातही जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात तासागणिक वाढ होत आहे. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहचला आहे. पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले आणि 13500 क्षमतेचे डिंभे धरण 92 टक्के भरले असून या धरणातून दुपारी 1 वाजता 2500 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हे पाणी घोड धरणात येत आहे. वडज मधूनही सांडवा विसर्ग वाढविण्यात आला असून तो 1500 क्युसेक करण्यात आला आहे. घोड धरणात हे पाणी जमा होत असल्याने हे धरणातील पाणीसाठा 86 टक्के स्थिर ठेऊन या धरणातूनही 6480 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना डिंभे धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो.ह्या धरणाचे आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्याला बारा महिने पाणी पुरते. तर, पारनेर, श्रीगोंदा व करमाळा तालुक्यातील शेतीला आठ महिने पाणी दिले जाते. धरणातील पाणी साठ्यामुळे पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 49 हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com