दिलशाद सय्यद यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

दिलशाद सय्यद यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

अकोले |प्रतिनिधी| Akole

हिंद सेवा मंडळ संचालित ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा, अकोले येथील सौ. दिलशाद यासीन सय्यद यांची शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

शैक्षणिक दीपस्तंभ तर्फे शिक्षकदिनी महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, प्राध्यापक व साधनव्यक्ती यांचे प्रस्ताव मागितले होते. राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांतून 180 शिक्षकांनी आपले प्रस्ताव सादर केले.

सादर केलेले सर्व प्रस्ताव दर्जेदार व शिक्षकांच्या कार्याचे प्रतिबिंब दर्शविणारे होते. विविध उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण अध्यापनपद्धती तसेच करोना काळातील शाळा बंद असतानाही शिक्षण चालू ठेवण्यासाठी शिक्षकांनी केलेले कल्पक प्रयोग अतिशय उल्लेखनीय व वाखाणण्यायोग्य आहेत.

त्यातून सर्वांचे शैक्षणिक व सामाजिक, साहित्यिक कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान त्यांना दिला गेला. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com