मनपाच्या शाळांची डिजिटलकडे वाटचाल

शिक्षकांसाठी कार्यशाळा
मनपाच्या शाळांची डिजिटलकडे वाटचाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपा शाळेतील विद्यार्थी डिजिटल शिक्षणात मागे राहू नयेत यासाठी मनपाच्यावतीनेही डिजिटल शिक्षणास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनपा शाळेतील शिक्षकांसाठी डिजिटल स्कूल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाच्यावतीने तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन डिजिटल शाळांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

महानगरपालिका शाळेतील शिक्षकांसाठी महानगरपालिकेच्यावतीने डिजिटल शाळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर शेंडगे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक अमोल येवले, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुर्हे आदी उपस्थित होते. डिजिटल शाळेचे प्रणेते संदीप गुंड यांनी महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.