दिघी शिवारात शॉर्टसर्किटमुळे आगीत तीन एकर ऊस जळाला

दिघी शिवारात शॉर्टसर्किटमुळे आगीत तीन एकर ऊस जळाला

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) दिघी शिवारात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit of Electricity) लागलेल्या आगीत (Fire) तीन एकर ऊस (Sugarcane) जळून खाक झाल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील दिघी (Dighi) शिवारात रयतचे सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठलराव कोंडीराम करडक यांची गट नंबर 261 मध्ये शेती आहे. तेथे त्यांचा तीन एक तोडणीसाठी आलेला ऊस (Sugarcane) उभा होता. शेतीपिकाला (Crops) पाणी (Water) देण्याचे काम सुरु होते. दुपारी साडेबाराचे दरम्यान अचानक विजेचे शॉर्ट सर्कीट (Short Circuit of Electricity) झाले आणि ऊसाच्या शेताला आग (SuagarCane Fire) लागली. या आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्याने आगीला आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. आसपास काम करणारे शेतकरी धावून आले मात्र आगीचे लोळ पाहून काहीच करता आले नाही.

घटनास्थळावरील शेतकर्‍यांनी अग्निशमन (Firefighting) दलाला पाचारण करून ही आग (Fire) आटोक्यात आणल्याने सुदैवाने इतर शेतकर्‍यांचे कुठलेही नुकसान (Losses) झाले नाही. ही आग जवळच असलेल्या विजेच्या तारेच्या घर्षणामुळे झाली की शेतात सुरु असलेल्या कुपनलिकेच्या वायरच्या स्पार्किंगमुळे झाली हे कोणालाही सांगता आले नाही. मात्र या आगीत (Fire) तीन एकर ऊस जळाल्याने संबधित शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com