डिआयजींकडून नगर शहरातील पोलीस ठाण्याची तपासणी

डिआयजींकडून नगर शहरातील पोलीस ठाण्याची तपासणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणार्‍या कोतवाली, तोफखाना व भिंगार पोलीस ठाण्यातील वार्षिक कामाचा आढावा बुधवारी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात घेतला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, तोफखान्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, भिंगारचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस कार्यालय, पोलीस ठाणे व सर्व विशेष शाखांचा आढावा घेण्यासाठी उपमहानिरीक्षक डॉ. शेखर हे जिल्हा दौर्‍यावर आहे. मंगळवारी कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर येथील आढावा घेतल्यानंतर बुधवारी त्यांनी अहमदनगर शहरातील तीन पोलीस ठाण्याचा आढावा घेतला. दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांनी सुरूवातीला पाहणी करून पोलीस अधिकर्‍यांना काही सूचना केल्या. यानंतर वार्षिक तपासणी करण्यात आली. पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मुलाखती झाल्या. चांगली कामगिरी करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना रिवार्ड देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com