टँकर पलटी होताच नागरिकांची डिझेलसाठी धावपळ

कुठे घडली घटना
टँकर पलटी होताच नागरिकांची डिझेलसाठी धावपळ

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील राजुरी (Rajuri) गावाजवळ दुचाकीस्वाराला वाचवताना डिझेलचा टँकर पलटी (Diesel Tanker Accident) झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान रस्त्यावर सांडत असलेला ज्वालाग्राही पदार्थ धोकादायकपणे पळवापळवी करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड (Crowd) उडाल्याचे चित्र होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरकडून भुम - खर्ड्याकडे जात असलेला डिझेलचा टँकर ((Diesel Tanker) (क्र. एम एच 16 बीसी 1314) हा राजुरी (Rajuri) गावाजवळ मोटारसायकलस्वारचा बचाव करताना चालकाचे नियंत्रण सुटून पलटी झाला. यामुळे डिझेलची टाकी फुटल्याने डिझेलचा पाट रस्त्याने वाहत होता. ही बातमी नागरिकांना समजताच महिलांसह नागरिकांनी जे सापडेल ते ड्रम, दुधाची कॅटली, बादली हातात घेऊन डिझेल भरण्यासाठी एकच झुंबड केली होती.

सुदैवाने पेट्रोलची टाकी शाबुत राहिल्याने तसेच तेथे आग नसल्याने मोठा अनर्थ टळला. या मार्गाने मयुर भोसले हे शिक्षक येत असताना त्यांनी घटना पाहताच ताबडतोब प्रशासनाला संपर्क केला. यामुळे राजुरी बीटचे पोलीस कॉ. सचिन सगर,  वाहतुक शाखेचे पोलीस कॉ. गंगे, पोलीस देवढे, पो. कॉ. पालवे व तसेच राजुरी गावचे पोलीस पाटील दत्तात्रय मोरे, गावचे संरपच गणेश कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांना कारवाईची ताकीद दिली. या घटनेत टँकरचा चालक नारायण सुभाष दहिफळे  हे किरकोळ जखमी झाले असुन त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले आहे. 

सुदैवाने पेट्रोलची टाकी शाबुत राहिल्याने अनर्थ टळला. या मार्गावरून मयुर भोसले हे शिक्षक येत असतांना त्यांनी ताबडतोब प्रशासनाला संपर्क केला. ताबडतोब पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com