
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथील व्यंकटा या पेट्रोल पंपावर (Petrol Pump) काम करणार्या तरूणाने पेट्रोल (Petrol) विक्री केलेले सुमारे 51 हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना दिनांक 28 फेब्रुवारी रोजी घडली आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
दरम्यान राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथील आरोपी गणेश रमेश गोसावी हा दि. 24 फेब्रुवारी पासून पेट्रोल पंपावर (Petrol Pump) कामावर आला होता. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी गणेश रमेश गोसावी हा देखील कामावर हजर होता. तेथे डिझेल (Diesel) व पेट्रोल (Petrol) वितरीत करण्याची त्याचे काम होते. दुपारी दोन वाजे दरम्यान गणेश गोसावी हा कोणास काही एक न सांगता निघून गेला. इतर कर्मचार्यांनी त्याला मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्याचा मोबाईल बंद होता. गणेश गोसावी याची सायंकाळी पाच वाजे पर्यंत वाट पाहीली. परंतु तो कामावर आला नाही. म्हणून त्याचे राहते घरी जावून खात्री केली असता तो घरी मिळून आला नाही. त्यानंतर कर्मचार्यांनी तो काम करत असलेल्या ठिकाणी मिटर रिडींगची पाहणी केली. तेव्हा गणेश गोसावी याने दुपारी दोन वाजेपर्यंत डिझेल व पेट्रोलची विक्री करून जमा झालेली 51 हजार 472 रूपये रोख रक्कम (Money) घेऊन पोबारा केल्याचे लक्षात आले.
पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक अशोक सोनवणे यांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गणेश रमेश गोसावी, रा. राहुरी फॅक्टरी, याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 239/2023 भादंवि कलम 408 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.