डिझेल इंजिन चोरणार्‍या अल्पवयीन टोळीचा छडा

डिझेल इंजिन चोरणार्‍या अल्पवयीन टोळीचा छडा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर पोलिसांनी टाकळी ढोकेश्वर परिसरातील शेतकर्‍याची बंधुचे डिझेल इंजिने चोरणार्‍या टोळीचा छडा लावला आहे. चार अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याचे पारनेर पोलिसांनी उघड केले असुन आरोपी व मुद्देमाल पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

अल्पवयीन चोर हे खामकर झाप येथील रहिवाशी आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्रमध्ये शेतकर्‍यांच्या विहिरीवरील पाणी उपसा करणारे इंजिनांच्या चोर्‍या होत असल्याने शेतकर्‍यांची उभी पिके जळून जाऊ लागली होती. म्हणून शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे इंजिन चोरांचा बंदोबस्त करावा अशी शेतकर्‍यांची मागणी होत होती.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सदर चोर्‍यांचा छडा लावण्यासाठी एक स्वतंत्र पोलीस पथक तयार करून शोध सुरू केला होता. पथकास सदरचे इंजिन चोरीचे गुन्हे व लोखंडी टपरी चोरीचा गुन्हा करणार्‍या एका अल्पवयीन मुलाला शोधन्यात पारनेर पोलिसांना यश आले. त्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी व त्या इतर तीन साथीदारांचे मदतीने चोर्‍या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 5 डिझेल इंजिन व 1 पत्र्याची टपरी असा एकूण 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com