112 ला कॉल करून दिली खुन झाल्याची माहिती, पुढे झाले असे काही...

112 ला कॉल करून दिली खुन झाल्याची माहिती, पुढे झाले असे काही...

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

डायल 112 वर फोन करून गावात खुन झाल्याची खोटी माहीती देणार्‍या रामडोह येथील इसमावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

112 ला कॉल करून दिली खुन झाल्याची माहिती, पुढे झाले असे काही...
Republic Day 2023 : दिल्लीतील 'कर्तव्य पथा'वर पथसंचलनाला सुरुवात

याबाबत अधिक माहिती अशी कि, दि.26 जानेवारी 2023 रोजी 07.49 वाजता डायल 112 वर तुकाराम नावाने मोबाईल क्र. 7620197893 वरुन कॉल आला कि वरखेड गावामध्ये खुन झाला आहे. त्यावरुन पोलीस निरीक्षक विजय करे यांचे आदेशावरुन सदर ठिकाणी पोसई मोंढे, पोना संजय माने, पोना अशोक कुदळे असे वरखेड ता. नेवासा येथे गेल्यावर सदर इसमाचे नाव तुकाराम गोरे व तो रामडोह येथील असले बाबत माहती मिळाली.

112 ला कॉल करून दिली खुन झाल्याची माहिती, पुढे झाले असे काही...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या विधानामुळे खळबळ, म्हणाले पहाटेचा शपथविधी हा....

रामडोह येथे कॉलर तुकाराम गोरे याचे राहते घरी गेले असता तेथे कोणत्याही प्रकारचा खुन अथावा गुन्हा घडलेला नव्हता. त्यावेळी तेथे हजर असलेल्या इसमास त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव तुकाराम बाबुराव गोरे रा. रामडोह असे असलेचे सांगितले. त्याच्या तोंडाचा आंबट उग्र वास येत होता. त्यास डायल 112 च्या कॉलबाबत विचारपुस करता त्याने मी डायल 112 ला खोटा कॉल केला असलेबाबत सांगितले. कॉलर तुकाराम गोरे हा दारुच्या नषेत असलेने त्यास ताब्यात घेवुन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारुच्या नषेत असलेबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे.

112 ला कॉल करून दिली खुन झाल्याची माहिती, पुढे झाले असे काही...
सासू-सासर्‍यांच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या

डायल 112 वर वरखेड गावामध्ये खुन झाला आहे अशी खोटी माहीती देणारा आरोपी तुकाराम बाबुराव गोरे (वय 29 वर्षे) रा. वरखेड ता. नेवासा याचे विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गुरनं. 73/2023 भारतीय दंड विधान कलम 177 सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 85-1 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

112 ला कॉल करून दिली खुन झाल्याची माहिती, पुढे झाले असे काही...
चोरटे सहज ओरबडतात महिलांच्या गळ्यातील दागिने

डायल 112 या प्रणाली वर अचडणीच्या वेळीच कॉल करण्यात यावा. डायल 112 च्या प्रणालीवर खोटी माहीती देवुन दिशाभुल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी.

- विजय करे, पोलीस निरीक्षक, नेवासा

112 ला कॉल करून दिली खुन झाल्याची माहिती, पुढे झाले असे काही...
साखरेला दुहेरी दर लागू करणे शक्य
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com