धोत्री खुनातील संशयित दहा महिन्यांनी जेरबंद

धोत्री खुनातील संशयित दहा महिन्यांनी जेरबंद

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील धोत्री शिवारातील खुनाच्या घटनेतील आरोपीस तब्बल दहा महीन्यानंतर अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. स्वप्निल नामदेव थोरात (29, रा. सावरगाव ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जामखेड जवळील साकत रोडवर धोत्री शिवारात जुन्या काँटन जिनिंग मीलच्या गेटसमोर गणेश शिवाजी वारे (30, रा. संगम जळगाव ता. गेवराई जि. बीड) या तरुणाचा मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून काठीने व पाईपने मारहाण करून खुन करण्यात आला होता.

या घटनेतील एका आरोपीस जामखेड पोलीसांनी अटक केली होती. तर दुसरा स्वप्निल थोरात हा तेव्हापासून म्हणजे दहा महीन्यांपासून फरार होता पोलीस त्याचा शोध घेत होते. स्वप्निल नामदेव थोरात हा सावरगाव येथील आपल्या घरी असल्याची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे सपोनि सुनील बडे यांना खबर्‍याकडून मिळाली. यानंतर त्यांनी तात्काळ त्याच्या पथकासह सावरगाव या ठिकाणी आरोपीच्या घरी जाऊन छापा टकात त्यास शिताफिने अटक केली. सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे, पो.ना.कोपनर, अविनाश ढेरे, भागवत, श्री परेदेशी, विजय सुपेकर, नवनाथ शेकडे, सचिन देवढे, श्री धांडे यांच्या पथकाने केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com